Call: 78454 41238 (Shankar)
info@awakeconference.org
Blog

अॅन्जेलो टॉलेन्टिनो

कॅलीफोर्निया- वलेहो-  येथील कम्युनिटी बायबल चर्चच्या सेवेद्वारे  –१९९२ मध्ये अॅन्जेलो यांना ख्रिस्ताने पापांपासून मुक्ती दिली. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया-सॅन्टा बार्बरा येथे बी. ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनात शुभवर्तमानाच्या सेवेसाठी प्रभूचे पाचारण जाणवले. त्याच्या तयारीसाठी त्यांनी कॅलीफोर्नियातील प्लेझेंट हिल येथील  ग्रेस स्कूल ऑफ थिओलोजीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर वलेहो येथील कॉर्नरस्टोन सेमिनरीमध्ये त्यांनी एम. डीव्ह.ची पदवी घेतली. ही पदवी घेत असताना त्यांनी  शिष्यत्व, नेतृत्वाचे प्रशिक्षण, सहभागितेचे गट, प्रौढांसाठी प्रशिक्षण सत्रे आणि मंडळीमध्ये उपदेश करणे यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. मेक्सिको ,फिलिपिन्स व भारतामध्ये त्यांना मंडळीचे नेते व पाळक यांना प्रशिक्षण देण्याच्या अनेक संधी मिळाल्या. अॅन्जेलो व त्यांची पत्नी चेनेट यांना चार मुले आहेत- ताची ,कार्लो , कॅरिस व अॅलीथिया.

You might be interested in …