तुम्ही किती शक्तिवान आहात? तुम्ही स्वत:ला समर्थ समजता का? खरे आध्यात्मिक सामर्थ्य परावलंबी असण्यानेच येते. येशूने म्हटले, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही.”
अवेक २०१५
“जोडलेले”
अखिल भारतीय युवा परिषद
१४-१६ ऑगस्ट , २०१५ युनियन बिब्लिकल सेमिनरी, पुणे (१७ ते ३० वयोगटासाठी खुली)
तुम्ही किती शक्तिवान आहात? तुम्ही स्वत:ला समर्थ समजता का? खरे आध्यात्मिक सामर्थ्य परावलंबी असण्यानेच येते. येशूने म्हटले, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.” फलदायी ख्रिस्ती जीवन हे येशूच्या सान्निध्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे व त्याच्या लोकांद्वारे मिळणाऱ्या त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे आहे. तुम्ही ख्रिस्ताशी, देवाच्या वचनाशी , त्याच्या मंडळीशी जोडले गेले आहात का? ऑगस्ट२०१५ मध्ये आम्ही खरे सामर्थ्य काय हे समजून घेत असताना आम्हाला सामील व्हा.
परिषदेची प्रमुख आकर्षणे
प्रभावी पाळक व मंडळीच्या नेत्यांचे आव्हानपर संदेश
दर संध्याकाळी मिशनरी कार्यावर खास भर
इंग्रजी व मराठीतील ख्रिस्तकेंद्रित स्फूर्तीदायी गीते
१७ ते ३० वयोगटातील सर्वांसाठी “अवेक” खुली आहे
उत्तेजन देणारे चर्चागट तसेच बायबलमधून वैयक्तिक मार्गदर्शन
एफ एम प्रक्षेपणाद्वारे सर्व सभांचे त्याचवेळी भाषांतर केले जाईल. त्यासाठी रेडीओ व इयरबडस पुरवले जातील.
सर्व मंडळ्यांसाठी खुले!
आकर्षक चर्चासत्रे
वचन आणि शुद्धता : लैंगिक पापाबाबत येशू आपल्याला कशी मदत करतो?
सामाजिक माध्यमांपासून संपर्क तोडणे : इंटरनेटशी तुम्ही खूपच जोडलेले आहात का?
स्थानिक मंडळीत माझे स्थान काय आहे?
येशूबरोबर दररोज चालणे
मराठीमध्ये वेगळे परिसंवाद भरवले जातील.
परिषदेचे शुल्क
लवकर नोंदणी करा ! ९९९रु. हा सवलतीचा दर फक्त जुलै१५ पर्यंतच उपलब्ध आहे. त्यानंतर नोंदणी शुल्क प्रत्येकी १२५० रु. राहील. यामध्ये परिषदेचे साहित्य व भोजन यांचा समावेश आहे.
परिषदेच्या स्थळी (युनियन बिब्लीकल सेमिनरी, पुणे) राहाण्यासाठी प्रतिरात्री ४०० रुपये या दराने मर्यादित जागा उपलब्ध आहेत. स्त्री व पुरुष यांना राहण्यासाठी वेगळी सोय केली आहे.