Contact: 98225 66576 | info@awakeconference.org

अवेक युवा पिरषद

August 16-18, 2019

अवेक २०१५

 

“जोडलेले”

अखिल भारतीय युवा परिषद
१४-१६ ऑगस्ट , २०१५ युनियन बिब्लिकल सेमिनरी, पुणे
(१७ ते ३० वयोगटासाठी खुली)

तुम्ही किती शक्तिवान आहात? तुम्ही स्वत:ला समर्थ समजता का? खरे आध्यात्मिक सामर्थ्य परावलंबी असण्यानेच येते. येशूने म्हटले, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.” फलदायी ख्रिस्ती जीवन हे येशूच्या सान्निध्याद्वारे, त्याच्या वचनाद्वारे व त्याच्या लोकांद्वारे  मिळणाऱ्या त्याच्या  सामर्थ्यावर अवलंबून राहणे आहे. तुम्ही ख्रिस्ताशी, देवाच्या वचनाशी , त्याच्या मंडळीशी जोडले गेले आहात का? ऑगस्ट२०१५ मध्ये आम्ही  खरे सामर्थ्य काय हे समजून घेत असताना आम्हाला सामील व्हा.

परिषदेची प्रमुख आकर्षणे

 • प्रभावी पाळक व मंडळीच्या नेत्यांचे आव्हानपर संदेश
 • दर संध्याकाळी मिशनरी कार्यावर खास भर
 • इंग्रजी व मराठीतील ख्रिस्तकेंद्रित स्फूर्तीदायी गीते
 • १७ ते ३० वयोगटातील सर्वांसाठी “अवेक” खुली आहे
 • उत्तेजन देणारे चर्चागट तसेच बायबलमधून वैयक्तिक मार्गदर्शन
 • एफ एम प्रक्षेपणाद्वारे सर्व सभांचे त्याचवेळी भाषांतर केले जाईल. त्यासाठी रेडीओ व  इयरबडस पुरवले जातील.
 • सर्व मंडळ्यांसाठी खुले!

आकर्षक चर्चासत्रे

 • वचन आणि शुद्धता : लैंगिक पापाबाबत येशू आपल्याला कशी मदत करतो?
 • सामाजिक माध्यमांपासून संपर्क तोडणे : इंटरनेटशी तुम्ही खूपच जोडलेले आहात का?
 • स्थानिक मंडळीत माझे स्थान काय आहे?
 • येशूबरोबर दररोज चालणे
 • मराठीमध्ये वेगळे परिसंवाद भरवले जातील.

परिषदेचे शुल्क

 • लवकर नोंदणी करा ! ९९९रु. हा सवलतीचा दर फक्त जुलै१५ पर्यंतच उपलब्ध आहे. त्यानंतर नोंदणी शुल्क प्रत्येकी १२५० रु. राहील. यामध्ये परिषदेचे साहित्य व भोजन  यांचा समावेश आहे.
 • परिषदेच्या स्थळी (युनियन बिब्लीकल सेमिनरी, पुणे) राहाण्यासाठी प्रतिरात्री ४०० रुपये या दराने मर्यादित जागा उपलब्ध आहेत. स्त्री व पुरुष यांना  राहण्यासाठी वेगळी सोय केली आहे.

Share This