Contact: 98225 66576 | info@awakeconference.org

अवेक युवा पिरषद

August 16-18, 2019

अवेक २०१६

“पूर्ण झाले आह.”

ऑनलाईन नोंदणी

अखिल भारतीय युवा परिषद
१३-१५ ऑगस्ट , २०१६ युनियन बिब्लिकल सेमिनरी, पुणे
(१७ ते ३० वयोगटासाठी खुली)

प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय इतर कोणत्याही नावामध्ये तारण नाही. येशूचे तारण करण्याचे  कार्य हे निखालस पूर्ण झालेले आहे – याचा अर्थ आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे, याचा अर्थ विश्वासी हा देवासमोर ख्रिस्ताइतकाच नीतिमान असा उभा राहू शकतो, याचा अर्थ ख्रिस्ताने पाप व मरण यांच्यावर विजय मिळवल्याने पूर्णपणे पाप काढून टाकण्याच्या अभिवचनाची आपल्याला खात्री मिळाली आहे. जर “पूर्ण झाले आहे” तर विश्वासीयाला ख्रिस्तामध्ये आशा, खात्री, आनंद आणि आत्मविश्वास आहे.  ख्रिस्ताचे हे पूर्ण झालेले कार्य आम्ही साजरे करत असताना तुम्हीही या आणि उत्तेजन प्राप्त करा.

परिषदेची प्रमुख आकर्षणे

 • प्रभावी पाळक व मंडळीच्या नेत्यांचे आव्हानपर संदेश
 • दर संध्याकाळी मिशनरी कार्यावर खास भर
 • इंग्रजी व मराठीतील ख्रिस्तकेंद्रित स्फूर्तीदायी गीते
 • १७ ते ३० वयोगटातील सर्वांसाठी “अवेक” खुली आहे
 • उत्तेजन देणारे चर्चागट तसेच बायबलमधून वैयक्तिक मार्गदर्शन
 • एफ एम प्रक्षेपणाद्वारे सर्व सभांचे त्याचवेळी भाषांतर केले जाईल. त्यासाठी रेडीओ व  इयरबडस पुरवले जातील.
 • सर्व मंडळ्यांसाठी खुले!

आकर्षक चर्चासत्रे

 • बायबल समजून घेऊन कसे वाचावे
 • तुमचा विश्वास सांगताना येणारे अडथळे कसे पार करावेत
 • मराठीमध्ये वेगळे परिसंवाद भरवले जातील.

परिषदेचे शुल्क

 • लवकर नोंदणी करा ! ९९९रु. हा सवलतीचा दर फक्त जुलै१५ पर्यंतच उपलब्ध आहे. त्यानंतर नोंदणी शुल्क प्रत्येकी १२५० रु. राहील. यामध्ये परिषदेचे साहित्य व भोजन  यांचा समावेश आहे.
 • परिषदेच्या स्थळी (युनियन बिब्लीकल सेमिनरी, पुणे) राहाण्यासाठी प्रतिरात्री ४०० रुपये या दराने मर्यादित जागा उपलब्ध आहेत. स्त्री व पुरुष यांना  राहण्यासाठी वेगळी सोय केली आहे.

Share This