Call: 78454 41238 (Shankar)
info@awakeconference.org

तुम्ही कोण आहात असे तुम्हाला वाटते? भारतातील मंडळी/चर्च अशा लोकांनी भरलेली आहे की आपण ख्रिस्ती आहेत असा दावा ते करतात; तरी त्यांना येशू म्हणेल, “ अहो, अधर्म करणाऱ्यांनो माझ्यापासून निघून जा.” तुम्ही एका ठराविक कुटुंबात , चर्चमध्ये किंवा संस्कृतीत जन्माला म्हणून तुम्ही ख्रिस्ती ठरत नाहीत – मग आता तुम्ही कोण आहात असे तुम्हाला वाटते?

अवेक २०१४

“एकदा तारलात की कायमचे बदललात”

अखिल भारतीय युवा परिषद
ऑगस्ट १५ ते १७ , युनियन बिब्लीकल सेमिनरी , पुणे
( १७ ते ३० वयोगटासाठी खुली )

तुम्ही कोण आहात असे तुम्हाला वाटते? भारतातील मंडळी/चर्च अशा लोकांनी भरलेली आहे की आपण ख्रिस्ती आहेत असा दावा ते करतात; तरी त्यांना येशू म्हणेल, “ अहो, अधर्म करणाऱ्यांनो माझ्यापासून निघून जा.” तुम्ही एका ठराविक कुटुंबात , चर्चमध्ये किंवा संस्कृतीत जन्माला म्हणून तुम्ही ख्रिस्ती ठरत नाहीत – खरा विश्वास हा एका चमत्काराची परिणती आहे, तो चमत्कार म्हणजे ख्रिस्ताने दिलेले व त्याला समर्पित केलेले नवे ह्दय. ख्रिस्ती व्यक्ती ही खऱ्या रीतीने देवाला जिवंत असते. देवाच्या कार्यासाठी व पापाच्या जाणीवेसाठी जिवंत. मग आता तुम्ही कोण आहात असे तुम्हाला वाटते? “एकदा तारलात की कायमचे बदललात” याचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे  हे शोधण्यासाठी ऑगस्ट मध्ये आमच्या परिषदेला या.

 परिषदेची वैशिष्टये

  • आवेशी पाळक व मंडळीच्या पुढाऱ्यांकडून आव्हानात्मक बायबल शिक्षण
  • मराठी व इंग्रजीमध्ये दुमदुमून टाकणारी, ख्रिस्तकेंद्रित भक्ती
  • दिल्लीचे पाळक व संगीतकार जॉय गिल यांचे खास संगीत
  • १७ ते ३० या वयोगटातील सर्वांसाठी “अवेक” खुली आहे
  • गटांमध्ये प्रेरणादायी चर्चा आणि एकेकाला बायबलमधून मार्गदर्शन
  • एफ एम प्रक्षेपणाद्वारे सर्व सभांचे त्याचवेळी भाषांतर केले  जाईल. त्यासाठी रेडीओ व  इयरबडस पुरवले जातील.
  • सर्व मंडळ्यांसाठी खुले!

परिसंवाद पुढील विषयांवर भरवले जातील :

  • अविश्वासी व्यक्तीशी डेटिंग / लग्न
  • तुमच्या वेळेद्वारे देवाचा सन्मान करणे
  • बायबलनुसार पैशाचा वापर
  • कामाच्या ठिकाणी/शाळा-कॉलेजात येशूचा गौरव कसा कराल ?
  • मराठीमध्ये वेगळे  परिसंवाद  भरवले जातील.

 परिषदेचा खर्च

  • लवकर नोंदणी करा ! ९९९रु. हा  सवलतीचा दर फक्त जून २२ जुलै १४ पर्यंतच उपलब्ध आहे.
    यामध्ये परिषदेचे साहित्य व भोजन  यांचा समावेश आहे.
  •  परिषदेच्या स्थळी ( युनियन बिब्लीकल सेमिनरी) राहाण्यासाठी प्रतिरात्री ४०० रुपये या दराने मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
    स्त्री व पुरुष यांना  राहण्यासाठी वेगळी सोय केली आहे.