Call: 78454 41238 (Shankar)
info@awakeconference.org

अवेक ही सुवार्तावादी परिषद असून लव्ह महाराष्ट्र या संस्थेच्या सौजन्याने पुण्यातील समविचारी स्थानिक मंडळ्यांद्वारे आयोजित केली आहे . प्रौढ तरुणांनी प्रभू येशू ख्रिस्त व त्याची मंडळी यांना समर्पण करावे म्हणून त्यांना उत्तेजन द्यावे अशी आमची इच्छा आहे.

“अवेक” विषयी

“ हे निद्रिस्ता, जागा हो, आणि मेलेल्यांमधून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडील.” इफिस. ५:१४

‘अवेक’ ही एक युवक परिषद असून,सम विचार असलेल्या मंडळ्यांनी एकत्र येऊन पुण्यातील लव्ह महाराष्ट्र या संस्थेद्वारे ती आयोजित केली आहे. युवकांनी भारतातील मंडळीच्या परिवर्तनासाठी, निर्धाराने व आवेशाने पुढे येऊन वैभवी प्रभू येशू ख्रिस्ताला व त्याच्या मंडळीला आलिंगन द्यावे असा या परिषदेचा उद्देश आहे.. प्रौढ तरुणांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य व्हावे म्हणून  त्यांना उत्तेजन द्यावे , त्यामुळे त्यांनी आपल्या  स्थानिक मंडळीचे कृतीशील सभासद बनावे व त्याद्वारे आपल्या राष्ट्राला शुभवर्तमान पोचले जावे अशी आमची इच्छा आहे.

पाप,जग व सैतान यांचा जोर आजच्या या पिढीमध्ये कधी नव्हे तितका दबाव पाडत आहे. पापाची फसवणूक व संशय यांना बळी पडण्याचे धोके शास्त्रलेखांमध्ये सांगितले आहेत. येशू ख्रिस्त आपल्याला जीवनाची पूर्णता देण्यास , जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना जागे करून सामर्थ्य देण्यास आला आहे. म्हणून पौलासोबत आम्हीही म्हणतो,  “जागा हो.”आम्ही तरुणांना गंभीरपणे घेतो आणि जाणतो की, येशूच्या कृपेद्वारे आणि आवेशाने समर्पित झालेल्या तरुणांच्या द्वारे  ख्रिस्तासाठी इतिहास बदलला गेला आहे आणि बदलला जाईल. आणि तो बायबलद्वारे व स्थानिक मंडळीद्वारे देवाच्या गौरवासाठी बदलला जाईल. ही आमची प्रार्थना आहे. हा आमच्या तुतारीचा निनाद आहे.

जागा हो. पापक्षमा व  तारणासाठी येशूवर विश्वास ठेव !

जागा हो. ख्रिस्ताच्या मंडळीसाठी स्वत:चा त्याग कर !

जागा हो. पाप व मोहाशी आवेशाने लढ!

जागा हो. जगिकपणाचा पाश दूर कर !

ये. येशूच्या नावासाठी आम्हांला सामील हो.

 सदस्य मंडळ्या

ख्राइस्ट कम्युनिटी चर्च, वाकड, पुणे

डिसायपल कम्युनिटी चर्च ,पुणे.

ख्राइस्ट बायबल चर्च, मुंबई