Contact: 98225 66576 | info@awakeconference.org

अवेक युवा पिरषद

August 16-18, 2019

ग्रेग रीड

ग्रेग यांनी कम्युनिटी बायबल चर्चमध्ये बायबल शिकवण्यात अनेक वर्षे भाग घेतला  आहे. त्यासोबतच परदेशी होणाऱ्या बायबल शिक्षणाच्या दौऱ्यामध्ये, इतकेच नव्हे तर युगांडा मधील वेस्ट मिनिस्टर बायबल कॉलेजमध्ये एक वर्ष बायबलचे शिक्षण दिले आहे. ग्रेग यांनी आपली एम. डीव्ह. २००९ मध्ये कॉर्नरस्टोन सेमिनरीतून पूर्ण केली असून सध्या ते मिशनरी कार्याचे संचालक म्हणून सेवा करतात. प्रभू जेथे पाठवेल तेथे आनंदाने सेवा करण्यास ते व त्यांची पत्नी समर्पित आहेत. ग्रेग व त्यांची पत्नी आपल्या चर्चमध्ये तरुण जोडप्यांसाठी नियमितपणे विवाहपूर्व समुपदेशनाचे वर्ग चालवतात. गेल्या वर्षी ग्रेग यांनी दुसऱ्या एका पाळकांसोबत युगांडामध्ये विवाह परिषद चालवली.

ग्रेग व त्यांची पत्नी डॉना जॉय ह्यांच्या विवाहाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. मोठा मुलगा मार्क हा फिलिपाईन्स मध्ये बायबलचे शिक्षण घेत आहे; जोनाथन हा सुद्धा कॉलेजमध्ये शिकत असून नुकतीच त्याने भारतामध्ये सहा महिन्यांचे काम पूर्ण केले आहे. धाकटी टसारा हिने फ्रेंचमध्ये कोर्स पूर्ण केला असून ती आता  शिकवण्याचे काम हाती घेईल.

You might be interested in …

Greg Reed

जॉय गिल

माईक लूकस

Share This