डग थॉम्पसन

Posted by on Apr 27, 2014 in uncategorized

डग थॉम्पसन

पास्टर डग थॉम्पसन ह्यांनी लोगॉस बायबल इन्स्टिट्यूट व मास्टर्स कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टॅलबट सेमिनरी व व्हिटफिल्ड थिओलॉजीकल सेमिनरी येथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. त्यांनी ग्रेस टू यु मध्ये फिल जॉन्सन यांच्यासाठी समुपदेशन सेवेचे सल्लागार म्हणून काम केले. तसेच जॉन मॅकआर्थर यांच्यासमवेत दौऱ्यावर जात रेडीओ बायबल सेवेमध्ये शिक्षण दिले. १९८४ साली ते कॅलिफोर्नियाच्या रिसीडा येथल्या ब्रिज बायबल फेलोशिप चर्चचे रोपण केले व तेथे त्यांनी सेवा केली. २५ वर्षांपूर्वी त्यांना मिडल टाऊन बायबल चर्चने त्यांना आपल्या कळपाचे संगोपन करण्यास पाचारण केले व ते आजपर्यंत तेथे पाळक आहेत. त्यांनी रुमेनिया, मेक्सिको शहर, फिलिपाईन्स, युगांडा येथील पाळकांना शिकवले असून ते अनेक परिषदा, शिबिरे व पाळकीय परिषदा यांचे वक्ते होते. त्यांनी लोगॉस बायबल इन्स्टिट्यूट व ग्रेस स्कूल ऑफ थिओलॉजी येथे प्राध्यापकाचे काम केले आहे. सध्या ते वलेहो येथील द कॉर्नरस्टोन सेमिनरीमध्ये ईश्वर परिज्ञानाचे प्राध्यापक आहेत. रिफॉर्मेशन अॅन्ड रिव्हायवल हे जर्नल ते प्रकाशित करीत असत. डग व त्यांची पत्नी जॅनीस यांच्या विवाहाला ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना चार मोठी मुले असून चार नातवंडे...

Read More »

माईक लूकस

Posted by on Apr 27, 2014 in uncategorized

माईक लूकस

माईक हे २००९ पासून वलेहो येथील कम्युनिटी बायबल चर्चच्या महाविद्यालयीन सेवेचे पाळक आहेत. याच चर्चच्या १९९६ साली झालेल्या  तरुणांच्या शिबिरामध्ये दिलेल्या शुभवर्तमानाच्या स्पष्ट शिक्षणाद्वारे त्यांची ख्रिस्ताशी तारणारा व प्रभू म्हणून ओळख झाली. येथे तरुणांमध्ये नऊ वर्षे सेवा  केल्यानंतर  प्रभूने त्यांना महाविद्यालयीन सेवेसाठी पाचारण केले. यासोबतच ते सध्या साप्ताहिक गृह शिक्षण गट, चर्चमधील  प्रौढ प्रशिक्षण गट, विवाहपूर्व समुपदेशन सेवा चालवतात. तसेच चर्चच्या वर्शिप बॅन्डमध्ये गिटार वाजवतात, अनेकांना शिष्यत्वाबद्दल शिकवतात व कॉर्नरस्टोन सेमिनरीमधून एम. डीव्ह. ची पदवी पूर्ण करीत आहेत. मायकल व त्यांची पत्नी यांचा विवाह २००० मध्ये झाला असून त्यांना एम.जे. हा एक मुलगा...

Read More »

जॉय गिल

Posted by on Apr 27, 2014 in uncategorized

जॉय गिल

जॉय गिल यांचा जन्म व  शिक्षण पंजाबमध्ये झाले. ते एक पाळक असून गीतकार , संगीतकार व गायक आहेत. ते गुरगाव येथील डीबीएफ या मंडळीचे पाळक आहेत. ही मंडळी डेल्ही बायबल फेलोशिप या संघटित मंडळ्यांचा एक घटक आहे. हा गट कोणत्याही संप्रदायाला जोडलेला नसून येशू ख्रिस्त केंद्रित आहे. पाळक होण्यापूर्वी जॉय यांनी अनेक कंपन्यांचे सीइओ म्हणून काम केले आहे. प्रभूची सेवा करण्यासाठी तो आपल्याला पाचारण करीत  आहे याची जाणीव त्यांना झाली आणि मे २०१२ मध्ये त्यांनी चर्चमध्ये पूर्ण वेळ सेवा करण्यासाठी आपले सामुदायिक विभागातील  काम सोडले . सध्या जॉय गुरगाव डीबीएफच्या  “येसू नाम सत्संग” नावाच्या हिंदी मंडळीचे पालनपोषण करीत आहेत. आपल्या कामाचा काही वेळ ते सुवार्ता केंद्रित , ख्रिस्ताला उंचावणाऱ्या गीतांची रचना करण्यास देतात. सोबतच ते ख्रिस्ती व्हिडीओ तयार करतात व हिंदी लेख लिहितात. तुम्ही याबाबत जास्त माहिती करून त्यांचे संगीत joygill.org  येथे ऐकू...

Read More »

एलियास फेअरफिल्ड

Posted by on Apr 18, 2013 in Uncategorized, uncategorized

एलियास फेअरफिल्ड

एका ख्रिस्ती घरामध्ये वाढत असताना लहान वयातच प्रभू येशूने आपल्या कृपेने एलियास यांचे तारण केले. कॅलीफोर्निया येथील मास्टर्स कॉलेजमधून २००३ साली त्यांनी कम्प्युटर सायन्स मध्ये बी.एस. ही पदवी घेतली. ह्याचवेळी त्यांना प्रभू सेवेसाठी पाचारण करीत आहे अशी जाणीव झाली. पदवीनंतर त्यांनी मेक्सिको व इंडोनेशिया येथील मिशन संस्थांमध्ये तसेच  इराकमधील एका सेवाभावी संस्थेत आय. टी. विभागामध्ये काम केले. २००५ ते २००८ मध्ये युसेमिटीजवळील ओकहर्स्ट इवॅन्जेलीकल फ्री चर्चमध्ये त्यांनी युवकांचे पाळक म्हणून सेवा केली. २००८ मध्ये त्यांनी वलेहो येथील कॉर्नरस्टोन सेमिनरीमध्ये एम. डीव्ह. चे शिक्षण घेण्यास सुरवात केली असून २०१४ पर्यंत पदवी प्राप्त करण्याची त्यांची योजना आहे. एलियास व त्यांची पत्नी जिलाया हे कॅलीफोर्नियातील वलेहो येथे राहत असून त्यांच्या विवाहाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले...

Read More »

ग्रेग रीड

Posted by on Apr 18, 2013 in Uncategorized, uncategorized

ग्रेग रीड

ग्रेग यांनी कम्युनिटी बायबल चर्चमध्ये बायबल शिकवण्यात अनेक वर्षे भाग घेतला  आहे. त्यासोबतच परदेशी होणाऱ्या बायबल शिक्षणाच्या दौऱ्यामध्ये, इतकेच नव्हे तर युगांडा मधील वेस्ट मिनिस्टर बायबल कॉलेजमध्ये एक वर्ष बायबलचे शिक्षण दिले आहे. ग्रेग यांनी आपली एम. डीव्ह. २००९ मध्ये कॉर्नरस्टोन सेमिनरीतून पूर्ण केली असून सध्या ते मिशनरी कार्याचे संचालक म्हणून सेवा करतात. प्रभू जेथे पाठवेल तेथे आनंदाने सेवा करण्यास ते व त्यांची पत्नी समर्पित आहेत. ग्रेग व त्यांची पत्नी आपल्या चर्चमध्ये तरुण जोडप्यांसाठी नियमितपणे विवाहपूर्व समुपदेशनाचे वर्ग चालवतात. गेल्या वर्षी ग्रेग यांनी दुसऱ्या एका पाळकांसोबत युगांडामध्ये विवाह परिषद चालवली. ग्रेग व त्यांची पत्नी डॉना जॉय ह्यांच्या विवाहाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. मोठा मुलगा मार्क हा फिलिपाईन्स मध्ये बायबलचे शिक्षण घेत आहे; जोनाथन हा सुद्धा कॉलेजमध्ये शिकत असून नुकतीच त्याने भारतामध्ये सहा महिन्यांचे काम पूर्ण केले आहे. धाकटी टसारा हिने फ्रेंचमध्ये कोर्स पूर्ण केला असून ती आता  शिकवण्याचे काम हाती...

Read More »