Contact: 98225 66576 | info@awakeconference.org

अवेक युवा पिरषद

August 16-18, 2019

जॉय गिल

जॉय गिल यांचा जन्म व  शिक्षण पंजाबमध्ये झाले. ते एक पाळक असून गीतकार , संगीतकार व गायक आहेत. ते गुरगाव येथील डीबीएफ या मंडळीचे पाळक आहेत. ही मंडळी डेल्ही बायबल फेलोशिप या संघटित मंडळ्यांचा एक घटक आहे. हा गट कोणत्याही संप्रदायाला जोडलेला नसून येशू ख्रिस्त केंद्रित आहे. पाळक होण्यापूर्वी जॉय यांनी अनेक कंपन्यांचे सीइओ म्हणून काम केले आहे. प्रभूची सेवा करण्यासाठी तो आपल्याला पाचारण करीत  आहे याची जाणीव त्यांना झाली आणि मे २०१२ मध्ये त्यांनी चर्चमध्ये पूर्ण वेळ सेवा करण्यासाठी आपले सामुदायिक विभागातील  काम सोडले . सध्या जॉय गुरगाव डीबीएफच्या  “येसू नाम सत्संग” नावाच्या हिंदी मंडळीचे पालनपोषण करीत आहेत. आपल्या कामाचा काही वेळ ते सुवार्ता केंद्रित , ख्रिस्ताला उंचावणाऱ्या गीतांची रचना करण्यास देतात. सोबतच ते ख्रिस्ती व्हिडीओ तयार करतात व हिंदी लेख लिहितात. तुम्ही याबाबत जास्त माहिती करून त्यांचे संगीत joygill.org  येथे ऐकू शकता.

You might be interested in …

Share This