Contact: 98225 66576 | info@awakeconference.org

अवेक युवा पिरषद

August 16-18, 2019

डग थॉम्पसन

पास्टर डग थॉम्पसन ह्यांनी लोगॉस बायबल इन्स्टिट्यूटमास्टर्स कॉलेज येथून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टॅलबट सेमिनरी व्हिटफिल्ड थिओलॉजीकल सेमिनरी येथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. त्यांनी ग्रेस टू यु मध्ये फिल जॉन्सन यांच्यासाठी समुपदेशन सेवेचे सल्लागार म्हणून काम केले. तसेच जॉन मॅकआर्थर यांच्यासमवेत दौऱ्यावर जात रेडीओ बायबल सेवेमध्ये शिक्षण दिले. १९८४ साली ते कॅलिफोर्नियाच्या रिसीडा येथल्या ब्रिज बायबल फेलोशिप चर्चचे रोपण केले व तेथे त्यांनी सेवा केली. २५ वर्षांपूर्वी त्यांना मिडल टाऊन बायबल चर्चने त्यांना आपल्या कळपाचे संगोपन करण्यास पाचारण केले व ते आजपर्यंत तेथे पाळक आहेत. त्यांनी रुमेनिया, मेक्सिको शहर, फिलिपाईन्स, युगांडा येथील पाळकांना शिकवले असून ते अनेक परिषदा, शिबिरे व पाळकीय परिषदा यांचे वक्ते होते. त्यांनी लोगॉस बायबल इन्स्टिट्यूट व ग्रेस स्कूल ऑफ थिओलॉजी येथे प्राध्यापकाचे काम केले आहे. सध्या ते वलेहो येथील द कॉर्नरस्टोन सेमिनरीमध्ये ईश्वर परिज्ञानाचे प्राध्यापक आहेत. रिफॉर्मेशन अॅन्ड रिव्हायवल हे जर्नल ते प्रकाशित करीत असत. डग व त्यांची पत्नी जॅनीस यांच्या विवाहाला ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना चार मोठी मुले असून चार नातवंडे आहेत.

You might be interested in …

Doug Thompson

जॉय गिल

Share This